निधन वार्ता

369

अण्णाजी गोंदोळे यांचे निधन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): नजिकच्या पळसगाव (जोगीसाखरा) येथील रहिवासी अण्णाजी श्रीपत गोंदोळे(वय ५२ वर्षे )यांचे दिनांक १२ जून २०२५ला निधन झाले.

ते नामदेव गोंदोळे (ड्रायव्हर)यांचे काका होत.त्यांच्या पश्चात पत्नी तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर दिनांक १३ जूनला सकाळी ११ वाजता गाढवी नदीचे तिरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

——————————+————————-

💐🙏💐सहवेदना 🙏

आदरणीय अण्णाजी गोंदोळे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत.त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो व या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो.हीच प्रार्थना 🙏

🎤✍️ संपादक, विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क