शिधापत्रिकाधारकांनो,तत्काळ तिमाही धान्याची उचल करा

155

जिल्हा पुरवठा कार्यालयाचे आवाहन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.१० : शासन निर्णयानुसार आगामी पावसाळा आणि परिणामी पुरपरिस्थितीच्या अनुषंगाने लाभार्थ्यांना जून महिन्यात तीन महिन्याचे जुलै ते ऑगस्ट पर्यंतचे धान्य वितरण करण्याचे निर्देश प्राप्त आहे. तरी जिल्हा पुरवठा कार्यालयाने त्याप्रमाणे नियोजन केले असून जून महिन्याचे धान्य शासकीय धान्य गोदामात पोहच झाले आहे.तसेच रास्तभाव दुकानात सुद्धा ते पोहच करणे सुरू आहे. माहे जुलै व ऑगस्ट महिन्याचे धान्य उचल करून शासकीय धान्य गोदामात पोहच करणे सुरू आहे.

जिल्ह्यातील एकूण ११९७ रास्तभाव दुकानापैकी १९६ गावाला जोडलेल्या १४७ दुकानात नवसंजीवन योजनेअंतर्गत पावसाळ्यामध्ये ज्या गावाचा पुरामुळे संपर्क तुटतो अशा गावांना जुलै ते सप्टेंबर या चार महिन्याचे धान्य पोहचं झाले आहे. ज्या रास्तभाव धान्य दुकानात तीनही महिन्याचे धान्य पोहच झाले आहे त्यांनी तात्काळ पूर्ण धान्य लाभार्थ्याला Epos मशिनद्वारे आनलॉईन पद्धतीने वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या दुकानात जून महिन्याचे धान्य प्राप्त झाले आहे. त्यांनी जून महिन्याचे धान्य तात्काळ लाभार्थ्यांना वितरीत करायचे आहे. जुलै व ऑगस्ट महिन्याचे धान्य सुद्धा जूनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे ते प्राप्त झाल्यानंतर त्वरीत जून महिन्यात लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे धान्य वितरित करायचे आहे अशा सूचना सर्व तालुका पुरवठा कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत.

लाभार्थ्यांना आवाहन !

पावसाळ्यातील अडचणी टाळण्यासाठी व आपले धान्य आपल्या घरी सुरक्षीत राहण्यासाठी जून महिन्यातच तिन महिन्याचे धान्य रास्तभाव दूकानातुन प्राप्त करुन घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा कार्यालयाकडुन करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

0000

फोटो साभार: गुगल