नागरी संरक्षण स्वयंसेवकांकरिता युवकांनी नोंदणी करावी

108

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली, दि. १८: युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या ‘मेरा युवा भारत’ (MY Bharat) या
उपक्रमांतर्गत युवकांना नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देशपातळीवरील या मोहिमेमुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी प्रशिक्षित आणि सज्ज स्वयंसेवकांचा एक सशका गट तयार होणार आहे. या उपक्रमाचा उद्देश नैसर्गिक आपत्ती, अपघात, आग, आणि इशार अनपेक्षित संकटांमध्ये स्थानिक नागरी प्रशासनाला सहाय्य करणारे शिस्तबद्ध, प्रशिक्षित आणि संवेदनशील स्वयंसेवक तयार करणे आहे. नागरी संरक्षण स्वयंसेवक बचाव व निर्वासन कार्य, प्रथमोपचार, आपत्कालीन काळजी, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, सार्वजनिक सुरक्षा तसेच पुनर्वसन कार्यात सक्रिय भूमिका बजावतील. सध्याच्या वाढत्या सुरक्षाविषयक गरजा आणि धोके लक्षात घेता, समुदाय-आधारित मजबूत प्रतिसाद यंत्रणा उभी करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘मेरा युवा भारत’ ही योजना युवकांमध्ये नागरी जबाबदारीची भावना निर्माण करून त्यांना व्यावहारिक जीवनरक्षक कौशल्यांचे प्रशिक्षण देणार आहे. या उपक्रमांतर्गत ‘माय भारत’ च्या विद्यमान स्वयंसेवकांसोबतच नवीन इच्छुक युवकांनीही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणी प्रक्रिया सोपी असून ती https://www.mybharat.gov.in/ या संकेतस्थळावरून करता येते.

गडचिरोली जिल्ह्यातील युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि देशसेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा यांनी केले आहे.

00000