सेवानिवृत्त बॅंक अधिकारी हिमकांत राऊत यांचे निधन

625

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली):सिताबर्डी (आरमोरी) परिसरातील भुविकास बॅंक येथील सेवानिवृत्त वसुली अधिकारी हिमकांत जनोबाजी राउत (६८ वर्षे) यांचे काल दिनांक २० एप्रिल २०२५रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.

ते शिक्षक राहुल राऊत व पतसंस्था रोखपाल प्रशांत राऊत यांचे वडील होत.ते सदा हसमुख, सहकार्य करण्याचे मनोवृत्तीचे व्यक्तिमत्त्व होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई,सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी आरमोरी स्थित गाढवी नदीचै घाटावर सकाळी ११.१५वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

————————————–

💐🙏💐 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आमचे आदरणीय काकाजी श्री हिमकांत जनोबाजी राउत साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत.संपूर्ण राऊत परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वर देवो.हीच प्रार्थना 🙏

💐🙏💐शोकाकुल
✍️🎙️विलास गोंदोळे
संपादक
विधायक दीपस्तंभ न्यूज

Previous article🌹 एप्रिल २०२५🌹
Next article🌹 एप्रिल २०२५🌹
Vidhayak Deepstambha
विधायक दीपस्तंभ ऑनलाइन वेबसाईट ,न्यूज ब्लॉग आणि यूट्यूब चॅनल आपल्या परिसरातील प्रत्येक घटना , वास्तव टिपणा - या निःपक्ष बातम्या , काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज अपटेड न्युज ब्लॉग समाजकारण , राजकारण , साहित्य , नाटक , सिनेमा , पुस्तक , लेखक , कलाकार , ग्लोबल ते लोकल, अर्थ , व्यापार , फॅशन यावर प्रकाश टाकणार. या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज चॅनेल आहे . वेळोवेळ