Heatstroke prevention:उष्माघातापासून बचावासाठी उपाययोजना!

127

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा 

दिवसेंदिवस वाढत असलेल्या उन्हाचे चटके विद्यार्थी,नौकरदार, कामगार,शेतकरी,फेरीवाले, विक्रेते,व्यावसायिक तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष विविध कामांसाठी बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना बसायला सुरुवात झालेली आहे.सदर बाबींपासून बचाव करण्यासाठी काय करता येईल.यासंदर्भात पुढील बाबी नक्कीच करता येतील.

 

हे करा

(सामान्य लोकांसाठी)

√ जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या. तुम्हाला तहान लागली नसेल. तरीही तहान हे निर्जलीकरणाचे चांगले सूचक नाही.

√ प्रवास करतांना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.

√ ओरल रीहायड्रेशन सोल्युशन ( ORS ) वापरा आणि लिंबू पाणी ताक/ लस्सी आणि फळांचे रस यासारखे घरगुती पेय प्यावे.

√ टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोंशिबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेले फळे आणि भाज्या खाव्यात.

√ पातळ, सैल, सुती शक्यतो हलके पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत.

√ तुमचे डोके छाकुन ठेवा.थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात छत्री, टोपी, टॉवेल, दुपट्टा, गमछा व इतर पारंपरिक साधनाचा वापरावे.

√ उन्हात बाहेर जातांना शूज किंवा चप्पल घालाव्यात.

√ रेडिओ, टिव्हीवर प्रसारित होणाऱ्या उष्णतेच्या लाटे बचाव उपायावर लक्ष द्या. स्थानिक हवामान बातम्यांसाठी वर्तमान पत्र वाचावीत.

√ भारतीय हवामान विभागाच्या ( IMD ) वेबसाईटवर https://mausam.imd.gov.in/ वर हवामानाविषयी अद्यावत माहिती घेत रहावे.

√ हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवा.

√ थेट सूर्यप्रकाश व उष्णतेच्या लाटा रोखा. दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावे. विशेषतः तुमच्या घराच्या सूर्यप्रकाशाच्या बाजूला थंड हवा येण्यासाठी त्यांना रात्री खिडक्या उघड्या कराव्यात.

√ जर तुम्ही घरा बाहेर जात असाल , तर तुमची घराबाहेरील कामे दिवसाच्या सकाळ व संध्याकाळ वेळेपर्यंत मर्यादित करावी.

√ दिवसाच्या थंड वेळामध्ये बाहेरील कामाचे नियोजन करावे.

 

*संवेदनशील व जास्त जोखीम असलेल्या लोकांसाठी*

✓ जरी कोणालाही उष्णतेचा ताण आणि उष्णतेशी संबधित आजाराशी कोणालाही त्रास होऊ शकतो. तरीही काही लोकांना इतरांपेक्षा जास्त धोका असतो. आणि त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष द्यावे.

 

*समाविष्ट घटक*

✓ लहान अर्भक आणि लहान मुले.

✓ घराबाहेर काम करणारे लोक 

✓ गर्भवती महिला

✓ ज्यांना मानसिक आजारपण असलेली व्यक्ती.

✓शारीरिकदृष्ट्र्या आजारी विशेषतः हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब. 

✓ थंड हवामानापासून ते उष्ण हवामानापर्यंतच्या प्रवांश्यानी त्यांच्या शरीराला उष्णतेला होण्यासाठी एक आठवडा वेळ द्यावा. जास्त श्रम टाळावेत आणि जास्त पाणी प्यावे.

 

*इतर खबरदारी*

 ✓ एकटे राहणाऱ्या वृध्द व्यक्ती किंवा आजारी व्यक्तीवर देखरेख ठेवली पाहिजे. आणि त्यांच्या आरोग्याची दररोज निरीक्षण केले पाहिजे.

✓ तुमचे घर थंड ठेवा; शटर, पडदे किंवा सनशेड वापरा. आणि रात्री खिडक्या उघदा ठेवा.

✓ दिवसा खालच्या मजल्यावर राहण्याचा प्रयत्न करावा.

✓ शरीर थंड करण्यासाठी पंखा, स्प्रे बाटल्या, ओलसर कापड आणि बर्फाचे टॉवेल वापरावा.

✓ पाण्यात पाय बुडवल्याने निर्जलीकण आणि शरीराची उष्णतेमुळे होणारी अस्वस्थता कमी होऊन जलद थंडावा मिळतो.

हे करू नका

१) उन्हात बाहेर पडणे टाळा, विशेषतः दुपारी १२:०० ते ४:०० 

२) दुपारच्या वेळी बाहेर असताना कठोर परिश्रम टाळा.

३) अनवाणी बाहेर जाऊ नका.

४) अति उष्ण वेळेत स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक क्षेत्र पुरेशा प्रमाणात हवा येण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

५) अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेट सॉफ्ट ड्रिंक्स किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेय टाळा. कारण यामुळे शरीरातील पाणी कमी होते.किंवा पोटात पेटके येऊ शकतात.

६) उच्च प्रथिनयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.

७) उभ्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका. वाहनातील तापमान धोकादायक ठरू शकते.

उपरोक्त सुचनांचे पालन केल्यास उष्माघातापासून लहान बालकांपासून आबाल वृद्धांपर्यंत स्वतःचा बचाव स्वतः करता येतो.

 

💻📚संकलन:

 ✍️विलास गोंदोळे 

    मुख्य संपादक 

   (जनहितार्थ प्रसारित)