विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली, दि.२३: अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात अर्ज करुन देखील प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे.तसेच भोजन, निवास, निर्वाह भत्ता, व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणे करिता शासनाने दि. २६ डिसेंबर २०२४ च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता विद्यार्थ्यांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करतेवेळी स्वतःचे आधार लिंक खाते क्रं. सादर केलेले नाही त्या विद्यार्थ्यांनी आपले खाते ऑनलाइन अर्ज ज्या लॉग ईन आय डी वरुन सादर केले आहे त्या वरुन आपले खाते क्र. दिनांक २८ मार्च २०२५ पर्यंत सादर करावे. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.
0000