सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक समितीची वार्षिक आमसभा उत्साहात

27

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी (जिल्हा गडचिरोली):महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक समिती आरमोरीची वार्षिक आमसभा जिल्हा परिषद केंद्र शाळा आरमोरी येथे नुकतीच उत्साहात पार पडली.

सभेच्या अध्यक्षस्थानी किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे हे होते.
उदघाटन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार यांनी केले.तर
प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष वसंत राऊत, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख मेघराज बुराडे , सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीराम सोरते , चांगदेव काळबांधे ,रघुनाथ राऊत आदी उपस्थित होते.

आमसभेत आमदार रामदास मसराम यांचा सत्कार करण्यात आला.तसेच सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या व मागण्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.सदर बाबी सोडविण्यासाठी आपण स्वतः लक्षपूर्वक प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी उपस्थितांना त्यांनी दिले.

यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार यांनी मार्गदर्शन करुन संघटनेचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष वसंत राऊत यांनी केले. संचालन देविदास चेटूले यांनी तर आभार बावणे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मधुकर राघोर्ते ,दादाजी खरकाटे प्रभाकर आंबोरकर मोहन तिजारे, डिमराज तिजारे ,आनंदराव ठाकरे,श्रीमती लिलाबाई हेमके , प्रतिमा चांगले , श्रीमती शोभाताई रासेकर ,श्रीमती नंदा हेमके यांनी मोलाचे सहकार्य केले.