श्री दत्त मंदिर देवस्थान सभा मंडपाचे भुमीपूजन

175

आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते

देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व मान्यवर उपस्थित

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): येथील श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व सदस्यांनी भाविकभक्त व जनतेच्या सोयीसाठी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचेकडे सभामंडपाची मागणी केली. सन २०२२-२०२३या वित्तीय वर्षात अंदाजीत किंमत १०लक्ष रूपयांचा सभा मंडप आपल्या स्थानिक विकास निधीतून मंजूर करून देवस्थानचे पदाधिकारी यांचे उपस्थित नुकतेच सभामंडपाचे भुमीपूजन आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते करण्यात आले.

सदर सभामंडपाचे मंजूरी बद्दल व सहकार्याबद्द्ल देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व सदस्यांनी, नागरिकांनी आमदार कृष्णा गजबे यांचे आभार व्यक्त केले.

नेहमी प्रमाणेच श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टचे समाजपयोगी व धार्मिक कार्य वाढत राहो.असे उद्गार आ.गजबे यांनी यावेळी काढले.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सर्वांच्या आभाराचा स्वीकार केला.

यावेळी नगराध्यक्ष पवन नारनवरे, तालुका अध्यक्ष नंदु पेट्टेवार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, नगरसेवक विलास पारधी,भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस संगीता राऊत, दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मीताई मने, सचिव महेंद्र शेंडे,नानाजी चोपकार,छगन हेडाऊ,चेटुले, वामनराव शेंडे,बी.टी.सेलोकर, प्रमोद सेलोकर, राहुल तितीरमारे,अरूण चोपकार तसेच सौ.तुळसाबाई बोरकर व सार्वजनिक दत्त मंदिर देवस्थानचे सर्व सदस्य व नागरिक उपस्थित होते.