जिल्हास्तरीय शाळा सुरक्षा समिती गठीत

66

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

गडचिरोली,दि.०९: उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यांनी सुमोटो जनहित याचिका क्र.०१/२०१८ मध्ये दिलेले आदेश दि. २०.०९.२०२४ व दि. ०७.०२.२०२५ अन्वये गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शाळांच्या (जि.प. व न. प.) भौतिक सुविधांची तपासणी करुन वस्तुस्थिती दर्शक अहवाल राज्य शासनास सादर करणेकरीता जिल्हास्तरीय शाळा सुरक्षा समिती गठीत करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, ०७ मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे सभा आयोजित करण्यात आली.

सभेत जिल्हास्तरीय शाळा सुरक्षा समिती गठीत करुन उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करुन गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शाळांच्या भौतिक सुविधांची निःपक्षपातीपणे तपासणी होण्याच्या दृष्टीने व भेटीचे नियोजनाबाबत अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी, यांनी मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली, अतिरिक्त पोलीस अधिक्षक गडचिरोली, अधिक्षक अभियंता सार्व, बांध, मंडळ, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, मुध्याधिकारी न.प. यांची निवड करण्यात आली. सदर सभेस सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गडचिरोली, एम. रमेश, अति. पोलीस अधिक्षक, गडचिरोली, सुमित मुंदडा, सहा. अधिक्षक अभियंता, सार्व. बांध, मंडळ, गडचिरोली, वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी (माध्य), जि. प. गडचिरोली, बाबासाहेब पवार, शिक्षणाधिकारी (प्राथ) जि. प. गडचिरोली, विवेक नाकाडे, उपशिक्षणाधिकारी जि. प. गडचिरोली, सुर्यकांत पिदुरकर, मुध्याधिकारी न.प. गडचिरोली, श्री. भरडकर, कार्य. अभियंता, समग्र शिक्षा, ए. एस. आमना न.प. देसाईगंज, जितेंद्र साहाळा, विस्तार अधिकारी (शिक्षण) जि. प. गडचिरोली यांचा समावेश आहे.

0000