विविध विभागांनी केले अथक परिश्रम व विशेष सहकार्य
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली, दि.९ :जिल्हाधिकारी गडचिरोली, अविश्यांत पंडा यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली द्वारे जिल्हयातील मार्कंडा ,चपराळा (ता. चामोर्शी ) तसेच पळसगाव (ता. आरमोरी )या ठिकाणी दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ पासुन महाशिवरात्री निमीत्ताने विविध यात्रांचे आयोजन करण्यात आले होते.यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व विविध विभागातील अधिकारी,कर्मचारी आदींनी नियोजनबध्द पध्दतीने केलेल्या कार्याची तत्परतेने अंमलबजावणी केल्यामुळे सदर विभाग कौतुकास पात्र ठरले आहेत.
जिल्हयातील विशेषतः मार्कंडा येथील यात्रेमध्ये वैनंगगा नदीपात्रामध्ये कोणतीही अनुचित घटना घडु नये या करीता एसडीआरएफ नागपूर येथील २८ जवानांचे पथक, पोलीस विभागातील बचाव पथक, बोट व इतर बचाव साहित्यासह तसेच आपदा-मित्र व आपदा-सखी यांचे पथक मार्कडा येथे यात्रा कालावधीमध्ये तैनात करण्यात आले होते.
सदरचे यात्रा व्यवस्थापनामध्ये जिल्हयातील विविध विभाग ज्यामध्ये महसूल विभाग, पोलीस विभाग, जिल्हा परिषद तसेच यात्रा व्यवस्थापनाचे दृष्टीने सहभाग घेतलेले सर्व विभाग यांनी यात्रा सुरक्षित व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक प्रयत्न केले.
गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सूर्यवंशी यांनी मार्कंडा यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वेळोवेळी बैठकांचे आयोजन करुन सर्व विभागांना दिशानिर्देश दिले.
दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ ते ०७ मार्च २०२५ या कालावधीमध्ये यात्रा यशस्वीपणे पार पडण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अतंर्गत राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नागपूर यांचे पथक तसेच आपदा मित्रांनी घेतलेल्या परिश्रमामुळे नदीमधील पाण्यामध्ये होणारी जिवित हानी टाळण्यात यश येवून अनेकांचे प्राण वाचविण्यात आले. पोलीस विभागाद्वारे केलेल्या गर्दी व्यवस्थानामुळे मार्कंडा यात्रा सुरळीत पार पडलेली आहे. सदर केलेल्या उपाययोजनामुळे जिल्हयातील सर्व यात्रा सुरक्षितपणे पार पाडण्यात आलेल्या असुन कुठलीही अप्रिय घटना घडलेली नसून जिवित हानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे दृष्टीने जिल्हयातील सर्व आपदा मित्रांनी महत्वपुर्ण भुमिका पार पाडलेली आहे.
उपरोक्त सर्व यात्रांचे आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन उपविभागीय अधिकारी, चामोर्शी रणजित यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येऊन तहसिलदार प्रशांत घोरुडे, संवर्ग विकास अधिकारी पं.स. चामोर्शी सागर पाटील, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. चामोर्शी अमुल कादबाने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, सहायक महसूल अधिकारी आपत्ती व्यवस्थापन शाखा स्वप्नील माटे, आपदा मित्र चंद्रशेखर मोलंगुलवार, अजित नरोटे, कल्पक चौधरी, मयुर किन्नाके यांचे सहकार्याने यात्रा आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडण्यात आलेली आहे.
0000