विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.९: जिल्हा रेशीम कार्यालय आरमोरी, गडचिरोली येथे ५ मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी, अविश्यांत पंडा यांनी भेट दिली.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी वडसा,श्रीमती मानसी,तहसीलदार चौधरी, आरमोरी, उपअभियंता, सा.बां. श्री. पारधी आदी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पंडा यांनी कार्यालयातील ग्रेनेज, सुरु असलेले काम, अंडीपुंज उत्पादन, कार्यालयीन डेमो प्लॉट/परीसरची पाहणी करुन टसर व मलबेरी बाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यांनी कार्यालयातील Seri प्रदर्शनीला भेट देऊन अंडीपुंज, अळयांचे विविध अवस्था व धागा याची पाहणी केली. टसर अळीचे जीवन चक्र इत्यादी बाबत ही माहिती जाणून घेतली.
कार्यालयातील उईके, वरीष्ठ तांत्रीक सहायक कु. लोणारे, क्षेत्र सहायक बिडकर, वरीष्ठ सहायक व रोजमजूर इत्यादी उपस्थित राहून सहकार्य केले.
0000