विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): शिवजयंतीच्या पावनपर्वावर दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी डॉ. आशिषदादा कोरेटी यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ.आशिषदादांच्या मार्गदर्शनात व नागरिक तसेच कांग्रेस पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.
त्यानंतर कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर प्रकाश टाकला.शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींचे लोकसंघटन करून स्वराज्याची स्थापना केली.महाराष्ट्राचे नावाचा डंका चारही दिशांना हयातभर पसरविण्याचे अहोरात्र कार्य केले.असेच शिवकार्य शिवनितीने गडचिरोली जिल्ह्यातील अविकसित भागात विकासरुपी सुजलाम सुफलाम होण्यासाठी कार्यरत राहू असा शिवजयंतीच्या निमित्ताने संकल्प केला.शिवाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणा केल्या.
या प्रसंगी कार्यक्रमाला काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव (आदिवासी कॉंग्रेस) डॉ. आशिषदादा कोरेटी, शहर अध्यक्ष शालिक पत्रे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे विभागीय समन्वयक सारंग जांभुळे, विजय सुपारे तालुका उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी, नीलकंठ गोहने तालुका किसान अध्यक्ष , अंकुश गाढवे माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष , पत्रकार विलास गोंदोळे, निशांत वनमाळी एन यु सी आय जिल्हाध्यक्ष, गणेश तिजारे, मनोज सपाटे ,आशुतोष भरणे ,अक्षय बागडे ,भास्कर नाकतोडे ,निशांत मने ,मनोज तितरमारे ,अतुल भोयर ,प्रधान महाराज सायगाव ,प्रा. नरेश रहाटे ,श्रीकांत आतला, सचिन बोरकर , सौरभ तितीरमारे ,मनोहर नागापुरे , उमेश हर्षे , प्रसाद सपाटे कालींदा भरे , भोयर ताई आदी मान्यवर उपस्थित होते.