जिल्हा अध्यक्षपदी नितीन संगीडवार,कार्यकारी अध्यक्ष जयंत बल्लमवार ,उपाध्यक्ष अशोकराव पोरेड्डीवार,सौ.ममता कोतपल्लीवार सचिव मंगेश गदेवार तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रविण चन्नावार यांची निवड
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली:अखिल भारतीय गाणली समाज संघटना जिल्हा गडचिरोलीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांची सभा शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर अरुण पुण्यपरेड्डीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.
त्यामध्ये सर्वानुमते अखिल भारतीय गाणली समाज संघटना जिल्हा अध्यक्ष नितीन आनंदराव संगीडवार, कार्यकारी अध्यक्ष जयंत बलमवार उपाध्यक्ष अशोकराव पोरेड्डीवार घोट, सौ.ममता कोतपल्लीवार, सचिव मंगेश गदेवार सहसचिव स्नेहल संतोषवार, कोषाध्यक्ष घनश्याम मनबतूलवार, सहकोषाध्यक्ष
सौ.पपिता चन्नावार ,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रविण चन्नावार, तर सल्लागार श्री शंकरराव कस्तुरवार,रविभाऊ चन्नावार म्हणून आदींची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी कार्यकारिणी सदस्य कमलाकर वडेट्टीवार,प्रशांत सावकार पोरेड्डीवार,अविनाश वडेट्टीवार घोट,प्रकाशराव तोडेवार,बंडोपंत वडेट्टीवार, सौ.सुनिता वडेट्टीवार उपस्थित होते.
नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाचे समाजबांधव यांचेकडून अभिनंदन केले जात आहे.








