संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात

69

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

गडचिरोली,दि. १४ः संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गडचिरोली येथे दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी संत शिरोमणी रोहिदास महाराजांची ६४८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्व प्रथमतः सहायक आयुक्त समाज कल्याण, डॉ. सचिन मडावी यांच्या हस्ते शिरोमणी रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन हार अर्पण करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण कार्यालयाचे समाज कल्याण निरीक्षक राहुल गोविंदलवार, श्री. कंकलवार, गजानन कामळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे कर्मचारी अतुल कोटगले यांनी केले.

कार्यक्रमाला सर्व कर्मचारी वृंद उपस्थित राहून सहकार्य केले.

0000