जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची सभा १२ फेब्रुवारीला

68

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

गडचिरोली, दि.११:जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे
अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची सभा दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी (शुक्रवार) ला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. परंतु सदर सभा प्रशासकीय कारणास्तव रद्द करुन दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी (बुधवार) ला सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.

सदर सभेत भ्रष्टाचारासंदर्भात जनतेच्या काही तक्रारी असल्यास, त्या तक्रारकर्त्यांनी आवश्यक पुराव्यांसह सभेच्या दिवशी विहित वेळेत उपस्थित राहुन सादर कराव्यात. असे आवाहन सदस्य सचिव, जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती, तथा निवासी उप जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

0000