प्रा.डाॅ. गजेंद्र बेदरे यांचे निधन

458

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी (जिल्हा गडचिरोली): चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील निलकंठ शिंदे महाविद्यालयात कार्यरत भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ.गजेंद्र रामदास बेदरे यांचे काल दिनांक १२डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३.४५वाजता हृदयविकाराने निधन झाले.

ते आरमोरी येथील दिवंगत प्राचार्य रामदास बेदरे सर यांचे कनिष्ठ चिरंजीव होत. प्रा.डाॅ.गजेंद्र बेदरे हे अत्यंत कुशाग्र बुध्दीचे तसेच सालस, सुस्वभावी, मनमिळावू स्वभावामुळे सुपरिचित होते.
ते शिक्षणक्षेत्रात विविध अनुसंधानात कार्यरत होते.तसेच त्यांना शोध निबंधाबद्दल गौरविण्यात आले होते.अशा गुणवंत प्राध्यापकाच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांचे पश्चात आई, पत्नी, दोन मुली, तीन बहिणी, जावई,भाचे व बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज शुक्रवार, १३डिसेंबर रोजी आरमोरी येथील गाढवी नदीचे तिरावर सकाळी ११वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

—————————
💐🙏💐
प्रा.डाॅ.गजेंद्र बेदरे सर यांना विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क व विलास व किशोर गोदोळे कुटुंबियांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 🙏 आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत.

🙏🎙️✍️ विलास गोंदोळे संपादक, विधायक दीपस्तंभ न्यूज
———-

—————