महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यात १५६ ठिकाणी एकाच दिवशी ऐतिहासिक प्रकाशन सोहळा १० नोव्हेंबर २०२४
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली), दिनांक ९ नोव्हेंबर २०२४: स्थानिक पंचशील बुद्ध विहार बर्डी, आरमोरी येथे दिनांक १० नोव्हेंबरला प्रा.डाॅ.अशोककुमार दवणे संपादित ‘भारताचं विद्यापीठ रमाई ‘ या महाकाव्य ग्रंथाचा प्रकाशन सोहळा सामाजिक कार्यकर्त्या भुमिका बागळे व मीना सहारे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य जय फुलझेले, माजी प्राचार्य ताराचंद नागदेवे, सेवा निवृत्त मंडळ अधिकारी वासुदेव अंबादे, यादवराव लोणारे आदी उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमास वाचक,अभ्यासक,कवी, लेखक व साहित्य, सामाजिक क्षेत्रातील महिला, पुरुष आदींनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रकाशन सोहळा संयोजक संगीता वाल्मिक रामटेके (पाटील) यांनी केले आहे.








