समाजोन्नतीसाठी ढिवर (भोई) समाजाने आवळली वज्रमूठ!

144

सायगावचे शेकडो समाज बांधव एकवटले

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):
तालुक्यातील नदीच्या काठावर वसलेले सायगाव येथिल बहुसंख्य असलेला ढिवर (भोई) समाज ग्राम पंचायत कार्यालयाच्या राजीव भवन येथे एकत्रीत होऊन समाजाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय विकासात्मक दर्जा देण्या संदर्भात मागण्यांसाठी चिंतन केले व समाज संघटनेची पायाभरणी केली.

याप्रसंगी बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा.भाग्यवान मेश्राम हे होते.तर बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

प्रा.मेश्राम यांनी अध्यक्षीय संबोधनात समाजाला पुढे नेण्यासाठी विखुरलेला समाज कुठलाही पक्षपाती न करता एकत्र आल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. तसेच वंचित असलेला हा समाज अतिशय गरीब व अशिक्षित असुन मच्छीमार हा मुख्य व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करीत असतो; परंतु समाजाला कोणत्याही योजनेचा लाभ किंवा भटकंती जात NT-B च्या आरक्षणाचा फायदा मिळालेला नाही.त्यासाठी समाजांनी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा आणि एकत्र या तरच समाजाचा विकास होनार असे प्रतिपादन केले.

यावेळी सायगाव येथिल ग्राम पंचायत चे सरपंच सौ शिल्पाताई विठ्ठल कोल्हे ,उपसरपंच मनोज बी.पांचलवार , सदस्य देवांगणाताई दुमाने, सदस्य चंदाताई मेश्राम व ढिवर समाजातील संपूर्ण बांधव ,भगिनी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल दुमाने यांनी केले. तर आभार राजकुमार मेश्राम यांनी मानले .

समाज बांधवातर्फे समितीचे गठन
गावातील समाजाची महीला व पुरुषांची समिती गठीत करण्यात आली असून सदर समितीचे सर्वानुमते श्री सुखदेव जी कोल्हे यांची अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली .

—————————————-

समाजाच्या कल्याणासाठी सायगाव ग्रामपंचायत राबविते उपक्रम
गावातील बहुसंख्य असलेला ढिवर समाज वास्तव्यास असुन या समाजाकडे कुठल्याही प्रकारची शेती किंवा आर्थिक साधन सामुग्री नाही. हा समाज अतिशय वंचित घटक असुन सरकारने विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातील या समाजाकडे दुर्लक्ष होत आहे.सायगाव ग्राम पंचायत कडुन तांडा वस्ती लोक सुधार योजनेसाठी गेल्या ४ वर्षांपासून अनेक विकासकामांसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवलेले आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत अंतर्गत घरकुल साठी 26 लोकांची कागदपत्रासहीत पंचायत समिती मार्फत प्रस्ताव पाठवलेले असुन शासनानी यांची दखल घ्यायला पाहिजेत. या अगोदर सदर ढिवर (भोई) समाजाला आमच्या ग्रामपंचायत कडुन मच्छीमार समाजासाठी ८ नाव(डोंगा),मत्सपकडण्यासाठी जाळ्या विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.
श्री मनोज बी.पांचलवार
उपसरपंच
ग्राम पंचायत कार्यालय सायगाव