डॉ . आशिष कोरेटी यांचा पुढाकार
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली),दि.१९ सप्टेंबर २०२४: स्थानिक शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींशी विविध विषयांवर सामाजिक विचारवंत डॉ.आशिष कोरेटी यांनी मार्गदर्शनरूपी संवाद साधला.
शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह आरमोरी येथे नुकतेच स्वागत समारंभ व परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून डॉ.आशिष कोरेटी होते.तर अध्यक्षस्थानी गृहपाल अतकरी मॅडम होत्या.तसेच प्रमुख अतिथी म्हणून गृहपाल कोडवते,मोटघरे मॅडम,जनबंधू, सामाजिक कार्यकर्ते निलकंठ गोहणे, अंकुश गाढवे,सारंग जांभुळे, श्रीकांत आतला आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना डॉ.कोरेटी म्हणाले की, सामाजिक सांस्कृतिक आर्थिक शैक्षणिक औद्योगिक व राजकीय क्षेत्रात प्रगती करायची असेल तर उत्तम तसेच उच्च शिक्षणाचे गरजेचे आहे.परिस्थितीशी दोन हात करून शिक्षणासाठी प्रयत्नशील राहुया असा विद्यार्थ्यांनी चंग बांधला पाहिजे.सर्वत्र स्पर्धेचे युग आहे.यात महिला,स्त्री किंवा मुलगी अथवा मागास आहे म्हणून विद्यार्थ्यांनींनी मागे राहू नये, निर्भय बनून आत्मविश्वासाने पाऊले उचलली पाहिजे.असा ठाम निर्धार करावा.तसेच शिक्षण घेतांना कुठल्याही बाबींची गरज पडल्यास आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असे अभिवचन याप्रसंगी देत आहे.असेही ते म्हणाले.
विचारमंचकावर उपस्थित अतिथींनी समयोचीत मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनींनी आपले मनोगत व्यक्त करुन दिलखुलास संवाद साधला.
यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थीनींनी, वसतिगृहातील सर्व कर्मचारी वृदांनी सहकार्य केले.









