विविध शालेय संघाची स्थापना*

83

शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षपदी विलास गोंदोळे

सखी सावित्री कमिटीच्या अध्यक्षपदी ऍड.चाटे

माता पालक संघाच्या अध्यक्षपदी प्रा.सुनंदा कुमरे

सर्व संघाच्या पदसिद्ध सचिवपदी प्राचार्य नितीन कासार

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): स्थानिक वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे  दिनांक २४-०८-२०२४ रोज शनिवारला शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली.तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चालू शैक्षणिक सत्राकरिता विविध कार्यकारिणींचे गठन करण्यात आले.

सभेची सुरुवात माता सरस्वती तथा स्वर्गीय वत्सलाबाई वनमाळी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

सभेच्या सुरुवातीस सभेस उपस्थित असलेल्या  वर्ग नर्सरी ते वर्ग १० च्या विद्यार्थ्यांच्या पालकांमधून शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली. मा. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळेमध्ये माता पालक संघ , सखी सावित्री समिती पदाधिकारी, शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात आली.

यानुसार उपस्थित पालकांमधून पुरुष अध्यक्ष व महिला अध्यक्ष यांची निवड करण्यात आली. यामध्ये शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षपदी विलास गोंदोळे, माता पालक संघाच्या  अध्यक्षपदी प्रा. सुनंदाताई कुमरे, सखी सावित्री समितीच्या अध्यक्षपदी अधिवक्ता विजय चाटे सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . तसेच सदस्य म्हणून श्रीमती कोमल वाढई , सुरेश सोरते , पंकज लोधे, श्रीमती रजनी वनवे , श्री. ठाकरे , मधुकर कोटगले ,सौ. गायत्री रामपुरकर , सुधाकर प्रधान , श्रीमती सुलोचना कुलसंगे यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून  विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.यात शाळेत सी.सी.टी.वी कॅमेरे , तक्रार पेटी बसवण्यात आल्याचे मुख्याध्यापकांकडून पालकांना माहिती देण्यात आली.
तसेच नवनिर्वाचित सर्व अध्यक्ष व सचिव यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शिक्षक, पालक यांच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी व अधिकाधिक ज्ञान निर्मितीवर भर विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवीण्याचा संकल्प करीत असल्याचे मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन पर्यवेक्षक किरण मांडवकर तथा आभारप्रदर्शन शिक्षक रविकांत म्हस्के यांनी केले.

सदर कार्यक्रम म.शी.प्र.मंडळ आरमोरीचे सचिव मनोजभाऊ वनमाळी यांच्या प्रेरणेतून तथा मुख्याध्यापक नितीन कासार यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला.

यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृदांनी सहकार्य केले.