सैनिक बंधूना पाठविल्या रक्षाबंधनानिमीत्त राख्या

267

कस्तुरी महिला भिसी गृपचा पुढाकार

आरमोरीकरांकडून होत आहे कौतुकाचा वर्षाव

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली)/दि.१५ आॅगस्ट २०२४:मातृभूमीची सेवा करणाऱ्या सीमेवरील सैनिकांना आरमोरी येथील कस्तुरी महिला भीसी गृपचे वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही राख्या पाठवुन कृतज्ञता व्यक्त केली.

देशाच्या सीमेवर प्राणाची बाजी लावून लढणारे सैनिक बांधव कुटुंबापासून दुर राहुन देशाचे संरक्षण करीत आहेत, त्यामुळेच आज आपण देशवायीय सुरक्षित आहोत.कस्तुरीगटाने राखी पौर्णीमेच्या सणानिमित्त राख्या पाठवून खऱ्या अर्थाने हा सण साजरा करण्याचा मनस्वी आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली.सोबतच स्वातंत्र्यदिनी 15 आॅगष्टला सर्प मित्रांना साप पकडण्याचे साहित्य वाटप, कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या सामाजिक दायित्वाचा परिचय करुन दिला.

याप्रसंगी कस्तुरी गटाच्या साधना भोयर. प्रिती भोयर,वर्षा तिजारे,सपना तितीरमारे,रंजना गौतम, माधुरी ठवकर,रजनी कीरणापुरे,चंद्रकला तिजारे,ममता धकाते,बाबी खरवडे,मनीषा मस्के व वंदना जुआरे आदी उपस्थित होते.

सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक ऋणाचे भान ठेवून, अनोखे उपक्रम राबवित असलेल्या महिला गटाचे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.