महात्मा गांधी विद्यालयात माता पालक संघाची स्थापना

205

बहुसंख्य शिक्षक, शिक्षिका व माता पालकांची उपस्थिती

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी दि.१२ आॅगस्ट २०२४: स्थानिक महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय येथे माता – पालक संघ स्थापन करण्यात आला.

यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक साईनाथ अद्दलवार होते .तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष विलास गोंदोळे, सहसचिव सुरेश आंबोणे,माजी सहसचिव दिवाकर ठाकरे, महात्मा गांधी उच्च माध्यमिक शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष उमेष हर्षे,सहसचिव चांगदेव सोरते, पर्यवेक्षक विरेंद्र गुंफावार , सौ.सुषमा कोतकोंडावार , सौ. लठ्ठे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सन २०२४-२५ या नवीन शैक्षणिक सत्राकरिता कार्यकारणी गठीत करण्यात आली.

या कार्यकारिणी करीता पदसिद्ध अध्यक्ष म्हणून साईनाथ अद्दलवार मुख्याध्यापक, महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरी , उपाध्यक्ष सौ. अरुणा लठ्ठे , सचिव कु.सुषमा भांडारकर, सहसचिव सौ. शारदा वारजूरकर ,महिला प्रतिनिधी सौ .सुषमा भांडारकर , सौ. शालू भोयर निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन हेमंत निखारे तर आभार कुमारी सुषमा भांडारकर मॅडम यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी यांनी सहकार्य केले.