इयत्ता ३ री च्या विद्यार्थ्यांनी काढल्या मनमोहक रांगोळ्या!

307

वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्काॅलरमध्ये ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी,वनचरे’ ची थीम 

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी दि.८ आॅगस्ट २०२४: स्थानिक वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे ‘ वृक्ष माझा मित्र ‘ या विषयावर दि.७ आॅगस्ट ला रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक संसाधने यांचे जतन आणि पर्यावरण संवर्धनासाठी जाणीवजागृती निर्माण करणे यासाठी इको क्लब फॉर मिशन लाइफ अंतर्गत विविध पर्यावरणपूरक शैक्षणिक कृतीचे आयोजन करण्याविषयी केंद्र शासनामार्फत सूचित करण्यात आल्या आहेत. या विषयानुषंगाने शाळेत आठवडा भर विविध कृती घेण्यात आल्या. झाडावर आधारित उपक्रम घेणे या थीम अंतर्गत ‘वृक्ष माझा मित्र’ विषयावर आधारित इय्यता ३ री च्या विद्यार्थ्यांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.

यासाठी विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत अनेक सुबक , सुंदर रांगोळ्या काढल्या. या स्पर्धेत इय्यता ३ री चे सर्व विद्यार्थी सहभागी झाले.

रांगोळ्याच्या माध्यमातून वृक्षाचे संवर्धन व संरक्षण करा असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यानी दिला .

मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मनोज वनमाळी यांच्या प्रेरणेने स्कूलचे प्राचार्य नितीन कासार यांच्या मार्गदर्शनात व कु. गुलनाज शेख यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला.

यशस्वीतेसाठी वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्काॅलरच्या सर्व शिक्षक,शिक्षिका व कर्मचारी वृदांनी सहकार्य केले.