निद्रीस्त प्रशासनाला जाग आणण्यासाठी
लोकहित संघर्ष समितीतर्फे प्रतिकात्मक आंदोलन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी , दि.८आॅगस्ट २०२४:
शहरातील बाजारपेठ वॉर्डातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी समोर खूप मोठया प्रमाणात खड्डे पडलेले असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे व या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची निर्मिती होऊन डेंगू, मलेरिया यासारख्या कीटकजन्य आजारांच्या निर्मितीला चालना मिळत आहे. तसेच या मार्गावरील ये-जा करणाऱ्या नागरिकांना सातत्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे .सदर खड्डे हे जिल्हा परिषद शाळा व आरोग्य केंद्र समोर असल्याने या ठिकाणी नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांची मार्गक्रमण सुरु असते. त्यामूळे अपघात होण्याची शक्यता बळावलेली आहे. कित्येकदा किरकोळ अपघात होऊन अनेक नागरिक जखमी झालेले आहेत ही गंभीर बाब ओळखून गाढ झोपेत असलेल्या प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतीकात्मक म्हणुन खड्ड्यात साचलेल्या पाण्यात धानरोवणी करून प्रशासनाचा निषेध दिनांक ७/८/२०२४ ला दुपारी ३:०० वाजता लोकहित संघर्ष समितीचे पदाधिकारी राहुल जुआरे व काॅंग्रेस नेते डॉ.आशिष कोरेटी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.
सातत्याने लोकहित संघर्ष समिती तर्फे आरमोरी शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडूजी करण्याबाबत मागणी होत असून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे .संबंधित खड्ड्याची डागडूजी करण्यात यावी अन्यथा लोकहित संघर्ष समिती ,आरमोरी तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिलेला आहे.
यावेळी लोकहित संघर्ष समितीचे पदाधिकारी देवानंद दुमाने, राहुल जुआरे ,सारंग जांभुळे ,आशुतोष गिरडकर, महेंद्र शेंडे, महादेव कोपूलवार, मनोज गेडाम , काॅंग्रेस नेते डॉ. आशिष कोरेटी ,
कॉंग्रेस किसान कमिटी आरमोरी चे तालुका अध्यक्ष नीलकंठ गोहणे, श्रीकांत आतला ,पंकज इंदुरकर ,लीलाधर मेश्राम ,गोपाल नारनवरे , रोहित बावनकर,सुरेश मेश्राम, विभाताई बोबाटे,सुमित खेडकर, सुरज ठाकरे ,श्रीराम ठाकरे ,विशाल चौके आदी बहुसंख्य परिसरातील नागरिक उपस्थित होते .









