कचरा व्यवस्थापन संदर्भात जनजागृती

199

कला व विज्ञान प्रदर्शनी

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी दि.३आॅगस्ट २०२४: वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्स, आरमोरी येथे वर्गनिहाय कला व विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन दिनांक ०१.०८.२०२४ रोजी करण्यात आले.

त्यामध्ये वर्ग १ ते १० च्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ओला कचरा व सुका कचरा या करिता वेगवेगळया कचरापेट्या बनवून आणल्या व सर्व वर्ग शिक्षकांनी वर्ग निहाय ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा ठेवावा या विषयी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सर्व वर्गामध्ये ओल्या कचरा व सुका कचरा संकलनाकरीता कचरापेट्या स्थापन करण्यात आल्या.

त्याचप्रमाणे इय्यता ७ वी च्या विध्यार्थ्यानी टाकावू पासून टिकाऊ या उपक्रमांतर्गत वेगवेगळया कलाकृती तयार करून प्रदर्शित केल्या .

ओला कचरा व सुका कच-याचे व्यवस्थापण करणे व आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जागृकता व्हावी यासाठी शाळेचे मुख्याध्यापक नितीन कासार यांच्या मार्गदर्शनात विज्ञान विभागाच्या ज्ञानेश्वरी मेश्राम आणि सर्व शिक्षकानी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .

सदर उपक्रमात शालेय विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.