गडचिरोली जिल्ह्यातील घटना/घडामोडी (संक्षिप्त)

138

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

१) रानडुक्कराच्या हल्ल्यात महिला जखमी:
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील देलोडा बुद्रुक येथील तुलाराम गेडाम यांच्या शेतात मका तोडणी करत असलेल्या महिलांवर रानडुकरांच्या कळपाने हल्ला केला.यात मका तोडणी करणार्या तीन महिला जखमी झाल्या.सदर घटना २३एप्रिलला सकाळी १०वाजताचे सुमारास घडली.जखमी महिलांवर वडधा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले असल्याची माहिती आहे.

२) मधमाशांच्या दंशात सात जण जखमी:
आरमोरी तालुक्यातील वैरागड नजिकच्या करपडा लगतच्या नदीघाटाजवळील शंकरपट आयोजनासाठी पटाची दाण (मैदान) आखणी करणा-या इसमांवर परिसरात असलेल्या पोळ्यातील मधमाशांनी हल्ला केला.यात सात जणांच्या डोक्यावर व चेह-यावर मधमाशांनी दंश केल्याने ते जखमी झाल्याची घटना २३एप्रिललाला दुपारी घडली.जखमींना तत्काळ वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.सध्यस्थितीत त्यांचेवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

३)ट्रक व दुचाकीच्या अपघातात आजोबा गंभीर; नातवंडे किरकोळ जखमी: चामोर्शी तालुक्यातील आष्टी गावावरून मार्कंडा (कं) कडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने एका दुचाकीस्वारास चिरडले.सदर घटना मार्कंडा(कं)क्रांसिंगवर २४ एप्रिलला दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान घडली.यात आजोबा गंभीर तर दोन नातवंडे किरकोळ जखमी झाले आहेत.ग्रामस्थांनी जखमींना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र प्रभाकर लोणारे (आजोबा)यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.तर दोन्ही नातवंडांवर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

४) एटापल्ली : तालुक्यातील मुख्यालयापासून १५किमी अंतरावरील बुर्गी,कांदोळी गावात गेल्या तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

५) गडचिरोली: येथील गोंडवाना विद्यापीठात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे (इग्नू) अभ्यास केंद्र सुरू करण्यात आले.सदर अभ्यास केंद्राचे उद्घाटन दि.२४एप्रिलला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय गोरे, डॉ.नंदाजी सातपुते, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नागपूरचे क्षेत्रीय निदेशक डॉ.लक्ष्मण कुमारवाड, सहाय्यक क्षेत्रीय निर्देशक डॉ.वेंकटेश्वरलू,अनुभाग अधिकारी चंद्रशेखर राजगुरे, प्राचार्य डॉ.राजन वानखेडे, समन्वयक डॉ.प्रिती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
काम काम करता करता शिक्षण व शिक्षणापासून वंचित राहिलेले यांना नव्याने शिक्षण घेण्याची तसेच अर्धवट राहिलेले उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधी गोंडवाना विद्यापीठात कार्यान्वित अभ्यास केंद्राच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मुक्त व दुरस्थ शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे.विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता तसेच अधिक माहितीकरिता इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. प्रीती पाटील यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

६) धानोरा: तालुक्यातील चातगाव येथील सर्च शोधग्रामधील माँ दंतेश्वरी रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २६ते २८एप्रिलदरम्यान शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात हायड्रोसील,हर्निया,अॅपेंडिक्स व शरीरावरील गाठी अशाप्रकारची लक्षणे असल्यास रूग्णालयात येऊन आॅपरेशन पूर्व तपासणी व या शिबीरासाठी नाव नोंदणी करता येईल.तसेच आॅपरेशन विनामूल्य असणार आहे.अशी माहिती आहे.

७) गडचिरोली: तालुक्यातील लागवड केलेल्या उन्हाळी धान पीकावर खोड किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

८) गडचिरोली: यंदाच्या खरीप हंगामात धान पिकासाठी एकरी २३हजार रुपयांचे पीककर्ज देण्याचा निर्णय जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने घेतला आहे.या निर्देशानुसारच बॅंका कर्जाचे वितरण करणार आहेत.

९) गडचिरोली:आरटीई मोफत प्रवेशासाठी पालकांना ३०एप्रिल पर्यंत आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत.सदर प्रक्रियेसंदर्भात अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी.अशी माहिती आहे.

१०) गडचिरोली: जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ वरिष्ठ व्यवसायिक बिगर व्यावसायिक अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांनी सन 2022-23, 2023- 24 या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेशित अनुसूचित जाती, इमाव, विजा भज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 30 एप्रिल पर्यंत अर्ज पाठविण्याची मुदत आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी पात्र अर्ज परिपूर्णरित्या तपासणी करून विविध अर्ज मंजुरीच्या प्रक्रियेसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली कार्यालयाकडे सादर करण्यात यावे. अशी माहिती प्राप्त झाली आहे.

💻माहिती संकलनर्ता
.🎙️✍️ विलास गोंदोळे
संपादक
विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क
—————————————-
🤳 वाचत रहा, बघत रहा… फक्त विधायक न्यूज
📚💻🧾🎙️🖋️