आरमोरीत नशा मुक्ती संदर्भात मार्गदर्शन १८फेब्रुवारीला

236

धैर्य समुह आरमोरीचा पुढाकार

तज्ज्ञांचे होणार मार्गदर्शन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली):अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस गडचिरोली आंतर समुह ग्रामीण (उत्तर) अंतर्गत कार्यरत धैर्य समुह आरमोरीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मद्यपिढीतांसाठी व नशा मुक्ती संदर्भात दिनांक १८फेब्रुवारी २०२४ रोज रविवारला दुपारी ठीक १ते ३.३०वाजेपर्यंत विवेकानंद विद्यालय आरमोरी येथे तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन होणार आहे.

कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून विवेकानंद विद्यालय संस्थापक कापकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल धात्रक, अधिवक्ता नर्गिस पठाण, विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे, विवेकानंद विद्यालय प्राचार्य श्रीपाद वठे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

गत दोन वर्षापासून मद्यपान करणा-या व्यक्तींची व्यसनमुक्ती व्हावी यासाठी जागतिक भातृभाव संघटना आरमोरी विभागात कार्यरत आहे.या सेवाभावी संस्थेचा एक भाग असलेल्या धैर्य समुहाने आरमोरी विभागात भरीव कामगिरी केली आहे.तसेच पुढेही हा समुह याहून अधिक प्रमाणात व्यसनमुक्ती व्हावी या हेतूने तन,मन,धन लावून त्यावर कार्य करणार आहे.सद्यस्थितीत सर्वत्र व्यसनाधीनता अधिक प्रमाणात बळावलेली दिसून येते.यावर नागरीकांच्या, व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य व सामाजिक बांधिलकी जोपासणारे सेवाभावी कार्यकर्ते व महानुभाव व्यक्ती यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीचे कार्य करणार आहे.

सदर व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केवळरामजी, उमेश एम,आशितोष डी,सचिन जी,नरेश के,वैभव एम.आदींनी केले आहे.