जागृत ओबीसी समाज बांधवांचे आवाहन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): सद्यस्थितीत धगधगत असलेले मराठा व ओबीसी आरक्षण.यात मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा एककलमी कार्यक्रम तसेच नुकतीच शासनाने काढलेले असंवैधानिक अधिसूचना, अध्यादेश याचा कडाडून विरोध करण्यासाठी आरमोरी तालुकातील व शहरातील सर्व ओबीसी समाज बांधव व भगिनींनी दिनांक ४फेब्रुवारी २०२४रोजी ठीक ११वाजता पोस्ट आॅफीस वडसा टी पॉइंट बर्डी (आरमोरी)येथे बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जागृत लोकनेते व ओबीसी बांधवांनी ई पत्रकातून केले आहे.
मराठा समाजाला ओबीसी समाजाचे कुणबी समाजाची प्रमाणपत्रे देऊन ओबीसी समाजात घुसवण्याची असंविधानिक अधिसूचना तसेच अध्यादेश दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी जारी करण्यात आला आहे.
मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करून ओबीसी समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय आरक्षण लाटण्याचा प्रयत्न करीत आहे.यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी या संदर्भात 16 फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे हरकती मागवल्या आहेत. त्या अनुषंगाने पोस्ट ऑफिस टी पॉईंट बर्डी आरमोरी या ठिकाणी पत्रपेटी मध्ये स्वतंत्र हरकतीचे लिफापे टाकायचे आहे. हरकतीचे पत्र, लिफापा व पोस्ट तिकीट ची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.
सदर उपक्रमात बहुसंख्य ओबीसी बांधव, भगिनी, विद्यार्थी, पालक, युवा वर्ग आदींनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक लोकनेते मधुकर दोनाडकर, विजय सुपारे, शालिक पत्रे, गोलू भोयर व ओबीसी समाज बांधव आरमोरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या ई पत्रकातून केले आहे.









