आरमोरीत काॅंग्रेसचे मौन व्रत

68

अहिंसा उत्सवासाठी पुढाकार

जेष्ठ श्रेष्ठ मान्यवरांची उपस्थिती

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली):अहिंसा के रस्ते या कार्यक्रमाला सहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभरात अनेक ठिकाणी अहिंसा उत्सवाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.त्यानिमित्ताने आरमोरी येथे पर्यावरण व गांधी दर्शन,गडचिरोली जिल्ह्यामध्ये तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पामुळे निसर्गावर होणारे दुष्परिणाम, गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक युवकांना रोजगार, जल-जमीन-जंगल, पहाड तथा पशुपक्षी व मानव जीवनावर प्रदूषणाचा दुष्परिणाम या विषयाच्या संदर्भात उपवास व मनवृत्ताचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस आदिवासी विभाग प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नामदेवराव उसेंडी, सहउद्घाटक माजी आमदार आरमारी विधानसभा क्षेत्र आनंदराव गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोलीचे हसनअली गिलानी,माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राजीव गांधी पंचायतराज संघटन महाराष्ट्र सचिव मनीषाताई दोनाडकर, माजी तालुका अध्यक्ष तथा मनोरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मनोजराव वामनराव वनमाळी, आरमोरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, शंकरराव सालोटकर ,काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष दीपक वामनरावजी वनमाळी ,सुप्रसिद्ध कवयित्री तथा माजी जिल्हा परिषद जि .प. सदस्य कुसुमताई आलाम, गडचिरोली कोपुलवार, नीलकंठ गोहणे, महेश तितरमारे ,माजी तालुका उपाध्यक्ष विजय सुपारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश गाढवे, मयूर वनमाळी अतुल वनमाळी ,निशांत वनमाळी, प्राचार्य साईनाथ उद्दलवार आदी मान्यवर व गांधी विचारधारेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना डॉ.उसेंडी म्हणाले की,महात्मा गांधींचा लढा समूहाला प्रेरणा देणारा आहे. अहिंसाविषयी त्यांचे तत्त्वज्ञान हे सर्वक्ष्रृत आहे.गांधीची विचारधारा ही पिढ्यान् पिढ्या घडविणारी उत्स्फूर्त चळवळ आहे.

महात्मा गांधी यांची शिकवण मानवाला प्रेम, मैत्री व करुणा शिकवते. हे अनमोल विचार देशाला देऊन गांधीजींनी प्रत्येक जाती, धर्मातील माणसांशी जोडण्याचा त्यांचा प्रत्येक लढ्यातून एकतेचा व समानतेचा संदेश मिळतो ,म्हणून महात्मा गांधी यांचा लढा मानवी समूहाला प्रेरणा देणारा आहे.असे प्रतिपादन अहिंसा कार्यक्रमाचे आयोजक लोकेश गारोदे यांनी केले.

यशस्वीतेसाठी उपस्थित सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले.