…..मृग बरसला ?

101

विलास गोंदोळे
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): गेल्या ‘मे’ महिन्यात अवकाळी पावसाने कहरच केला होता.यात शेतकरी वर्गाच्या भातपीक, भाजीपाला व फळपिकांची अतोनात नुकसान झाले होते.अनेक शेतकऱ्यांनी आपली भिजलेली धान्य,धान मिळेल त्या ठिकाणी वाळवण करून विक्री योग्य केले.असा मान्सून पूर्व पावसाचा धसका घेतला होता.त्यातच जून महिन्यातील आठवड्यात दिवसभर उकाड्याने नागरीकांना त्रस्त केले होते.मात्र अचानक आकाशात मेघ दाटून आले.हळुहळू हवा वाहायला लागली.आकाशात मेघांचा गडगडाट ऐकू येऊ लागला.अन् मृग नक्षत्राच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज दिनांक ९ जून २०२५ ला सायंकाळी ७.१५ वाजता तृषार्त धर्तीवर जलधारा काही क्षण धो धो बरसल्या.सारे आनंदाने म्हणू लागले, येगं येगं सरी…….ये रे ये रे पावसा….! परंतु हा काही मिनिटांतच झालेला पाऊस म्हणजे सर आली धावून म्हणायचं कि मृग नक्षत्राच्या नमनाला सलामीचा पाऊस बरसला..! असंच काहीसं म्हणावं लागेल.