भव्य कृषी प्रदर्शन १४जानेवारी पर्यंत
हजारो शेतकरी, तज्ज्ञ,अभ्यासकांची मांदियाळी
विदर्भातील डिजिटल मिडिया पत्रकारांनी दिली भेट
विधायक दीपस्तंभ
जळगाव/गडचिरोली: जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टीमचे वतीने जैन हिल्सवर गेल्या १०डिसेंबर२०२३पासून नाविन्यपूर्ण संशोधन व शेतकरी, उद्योजकांकरिता उपयोगी असलेले ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ हे भव्य कृषी प्रदर्शन सुरू झालेले आहे.हे कृषी प्रदर्शन १४जानेवारी२०२४ पर्यंत असणार आहे.
सदर प्रदर्शनात शेतकऱ्यांच्या विविधांगी विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन सुरू आहे.यात भविष्यातील शेती,मातीविना शेती,हायर्डोपोनीक,एरोपोनीक फार्मींग, टिश्यूकल्चर तंत्रज्ञान, जगातील प्रथम क्रमांकाची अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली बायोटेक लॅब, विविध पीके,फळपिके, फळप्रक्रिया केंद्र, विविध रंगाची फुले, शेतकरी वर्गाला शेती आधुनिक व कमी श्रमाची करणेकरिता पेरणीपासून मळणी ते धान्य ग्रेडिंग पर्यंत उपयोगी आधुनिक यंत्रसामग्री, ठिंबक, तुषार सिंचन, पाणी वेगाने सोडण्यासाठी गनमशीन, जलव्यवस्थापन, सौरऊर्जा प्रकल्प,ऊस शेती,भात शेती,केळी,आंबा,चिकू, डाळिंब,पपई इत्यादी फळझाडे लागवड , कांदा, बटाटे, टोमॅटो,मिरची लागवड व भरघोस उत्पादनासाठी वापरले जाणारे तंत्र, सेंद्रिय खते, जैवविविधता, कृषी तीर्थ मासीक व इतरही अनेक बाबींचे दर्शन घ्यायला मिळणार आहे.तसेच जैन इरिगेशन सिस्टीमचे संस्थापक भंवरलालजी जैन यांच्या अतुलनीय ज्ञान -विज्ञान-तंत्रज्ञान वर आधारित कार्याची अनूभुती यानिमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.
सदर या कृषी महाकुंभात विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकार जेष्ठ पत्रकार आनंद आंबेकर व देवनाथ गंडाटे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ३०डिसेंबरला सामील झाले होते.यात दिलीप घोरमारे, अनूप पठाणे, विलास गोंदोळे, आशिष लाकूडकर, सचिन जाधव, संजय धोंगडे, गणेश शेंडे ,राजेंद्र निमकर, शेख दिलदार शेख सिकंदर ,प्रशांत चंदनखेडे, सचिन मेश्राम, अनंता गोवर्धन, सुलेमान बेग, गोपाल कडूकर, राजेंद्र उट्टलवार ,सनी भोंगाडे, सुरेश डांगे, शेखर गजभिये, नथ्थू रामेलवार, कवीश्वर खडसे, संदीप गौरखेडे ,अनिल सिंग चव्हाण ,अनुप भोपळे, रुपेश वनवे, राजू डोंगरे, दिनेश लायचा आदींनी भेट दिली व माहिती तंत्रज्ञान जाऊन घेतले तसेच सर्वसामान्य व अनभिज्ञ असलेल्या शेतकरी बांधवांच्या जीवनात आशा पेरण्यासाठी याचा आपल्याकडे उपलब्ध माध्यमातून उपयोग करू असा आशावाद व्यक्त केला.
पाऊले चालती..जैन हिल्सची वाट म्हणत या बहुपयोगी हायटेक शेतीच्या प्रदर्शनाला शेतकरी, उद्योजक व नागरीक यांनी एकदा भेट द्यावी व आपले आयुष्य सुजलाम सुफलाम करावे असे आवाहन जैन इरिगेशन सिस्टीमचे आयोजकांनी केले आहे.








