मुदतवाढ:धान विक्रीसाठी ३१ डिसेंबर पर्यत ऑनलाईन नोंदणी करा

144

गडचिरोली जिल्हा पणन अधिकारी यांचे आवाहन आवाहन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.१७ डिसेंबरः आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025-26 मध्ये धान/भरडधान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणी करीता शासनाने १५ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत दिलेली होती. परंतू शेतक-यांच्या नोंदणीची आकडेवारी लक्षात घेता शासनाने सदर मुदतवाढ दिनांक ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवून दिलेली आहे.

त्यानुसार दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन मर्या, जिल्हा पणन अधिकारी कार्यालय, गडचिरोली अंतर्गत येत असलेल्या बिगर आदिवासी क्षेत्रातील शेतक-यांनी शासनाने दिलेल्या दिनांक ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या मुदतीत आपल्या आपल्या गावाला जोडलेल्या धान खरेदी केंद्रावर जावून धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात करावी असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी कार्यालय, गडचिरोली मार्फत करण्यात येत आहे.

0000

फोटो साभार: गुगल