१५०४ गावे खरीप पिकाखाली
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील सन २०२५-२०२६ या वर्षासाठी खरीप हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ०.७२ इतकी निश्चित करण्यात आली आहे.
तहसीलदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनाने ही संकलित पैसेवारी जाहीर केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण १६८९ गावे असून त्यापैकी १५५८ गावे खरीप पिकाखाली आहेत. याशिवाय रब्बी पिकासाठी पात्र आणि खरीप पिकाच्या दोन-तृतीयांश क्षेत्राखाली येणाऱ्या ४ गावे या वर्गात गणल्या गेल्या आहेत. खरीप पिकाखाली असलेल्या गावांपैकी ५८ गावांत यावर्षी पिके झालेली नाहीत.
खरीप पिकाखालील १५०४ गावांमध्ये पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचे नोंदले गेले असून ५० पैशांखाली पैसेवारी असलेले कोणतेही गाव नाही.
0000








