आरमोरीत सहकारी शेतकरी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

171

आमदार रामदासजी मसराम यांचा केला सत्कार

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी,( जिल्हा गडचिरोली)येथील सहकारी शेतकरी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार रामदासजी मसराम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 

या प्रसंगी सहकारी शेतकरी धान खरेदी केंद्राच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन आमदार रामदास मसराम यांचा सत्कार करण्यात आला.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार रामदास मसराम म्हणाले की,शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा व त्यांच्या मालाला सुरक्षित बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी अशा खरेदी केंद्रांची गरज आहे. हे केंद्र शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा एक टप्पा ठरेल.असा आशावाद व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार कृष्णा गजबे, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे,माजी सभापती परसराम टिकले,दिलीप घोडाम,सभापती मनोज मने, उपसभापती दिलीप निंबेकार, संचालक वामन प्रधान, संचालक पांडुरंग दोनाडकर, व्यवस्थापक अक्षय माकडे, संचालक संजय हेमके,नंदु पेट्टेवार, ईश्वर पासेवार,अनिल किरमे,राहुल तितीरमारे, महेंद्र शेंडे, गोंदोळे, निशांत वनमाळी, युवक काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी सूरज भोयर, अनुज घोसे,प्रकाश बांडे ,अर्चना मडावी तसेच बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.