रब्बी पिकाची अंतीम पैसेवारी जाहीर

123

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.२३: गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६८९ गावे असून रब्बी पिकाची गावे १४८ आहेत.त्यापैकी रब्बी गावांमध्ये पीके नसलेली गावे ९४ आहेत. सदर रब्बी पिक असलेल्या गावांपैकी ५० पैशाचे आत पैसेवारी असलेले रब्बी गावे असून ५० पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकूण रब्बी पिक असलेल्या गावांची संख्या ५४ आहेत. अशा प्रकारे एकूण ५४ गावांमधील रब्बी पिकाची सुधारीत पैसेवारी जाहीर केलेली आहे.

गडचिरोली जिल्ह्याची रब्बी पिकाची २०२४-२०२५ या वर्षाची सुधारित पैसेवारी ही ०.६४ रु. पै. आहे. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.