धान खरेदीस 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

120

खासदार डॉ नामदेवराव किरसान यांच्या प्रयत्नांना यश

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली -चिमूर:शासकीय धान्य खरेदी केंद्रात धान्य खरेदी करण्यासंदर्भात मुदतवाढ करण्याची मागणी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या कडे केली असता, गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव यांना पत्र लिहून आधारभूत किंमत खरेदी योजना हंगाम 2024-25 मध्ये, खरेदी केंद्रात धान खरेदी करीता 31 मार्च 2025 पर्यंत मुदत वाढ देण्याची मागणी केली. खासदार डॉ. किरसान यांच्या मागणीला यश आले असून शासकीय धान्य खरेदी केंद्रात धान खरेदी करीता 31 मार्च 2025 पर्यंत मुदत वाढ देण्याचे तातडीचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने संबंधित यंत्रणाना दिले आहे.

सदर निर्णयामुळे शेतकरी बांधव खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे अभिनंदन करीत आहेत.