आरमोरी तहसीलदार उषा चौधरी यांचे आवाहन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली ):राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या व त्यांच्या शेतांचा आधार चा सलग्न माहिती संच फार्मर रजिस्ट्री ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत तयार करून घ्यायची आहे . त्यामुळे आरमोरी तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन सदर नोंदणी करावी व शेतीविषयक विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आरमोरी तहसीलदार उषा चौधरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.
योजनेची थोडक्यात उद्दिष्टे
शेतकऱ्यांच्या व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व अद्यावत करणे तसेच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ पारदर्शक पद्धतीने वेळेवर उपलब्ध करणे, स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा विपणन, त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास सहाय्य पिक विमा, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यास सुलभता व किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल. याकरिता फार्मर आयडी सर्व शेतकऱ्यांनी तयार करून घेणे गरजेचे असून ऍग्री स्टॅक योजनेअंतर्गत विविध सरकार योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहजपणे उपलब्ध होण्यासाठी आधार संलग्न माहिती संच फार्मर रजिस्ट्री तयार करण्याची कारवाई महाऑनलाईन नागरी सुविधा केंद्रावर सुरू करण्यात आलेली आहे.
तरी प्रथमता सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड सोबत मोबाईल लिंक करून घ्यावे व त्यानंतर सातबारा आधार कार्ड व आधार लिंक असलेला मोबाईल सोबत घेऊन नजिकच्या सेतू केंद्रात जावे व फार्मर आयडी तयार करून घ्यावे असे आवाहन आरमोरीच्या तहसीलदार उषा चौधरी यांनी केले आहे.
(फोटो:गुगल साभार)








