पशु तज्ज्ञ, गो पालक व शेतकरी उपस्थित
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):-तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी एकदिवसीय गो आधारित शेती प्रशिक्षण कार्यक्रम तालुका पशुवैद्यकीय कार्यालयाच्या पटांगणात गो पालक व शेतकरी यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून राकेश शेलोकर व प्रतीक कहू गो अनुसंधान केंद्र देवलापार हे होते. प्रशिक्षणाचे अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्ह्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर विलास गाडगे हे प्रामुख्याने होते.
प्रशिक्षणाची प्रस्तावना डॉ. दीपक मद्दीकुंटावार ,सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय आरमोरी यांनी मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉक्टर लीना धोटे यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन पशुधन विकास अधिकारी( विस्तार) डॉ.महेश बिपटे पंचायत समिती आरमोरी यांनी गो पालकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील पशु सखीनी व शेतकऱ्यांनी आणि पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.








