काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे आवाहन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
देसाईगंज:येत्या २८ डिसेंबर रोजी नागपूर येथे काँग्रेसच्यावतीने काढण्यात येणाऱ्या रॅलीत आरमोरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आरमोरी विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक देसाईगंज येथे पार पडली. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
या बैठकीस माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान, तालुकाध्यक्ष राजेन्द्र बुल्ले, जीवन नाट, मिलिंद खोब्रागडे, महिला तालुकाध्यक्ष पुष्पा कोहपरे, जिल्हा उपाध्यक्ष महिला आरती लहरी, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र गजपुरे, तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष नितीन राऊत, माजी शहरध्यक्ष पिंकू बावने, प्रभाकर तुलावी, ओबीसी तालुकाध्यक्ष कैलाश वानखेडे, सेवादल तालुका अध्यक्ष दुशांत वाटगुरे, भिमराव नगराळे, राजकुमार मेश्राम, विजय पिल्लेवान, जयमाला पेंदाम, रजनी आत्राम, निलोफर शेख, विमल मेश्राम, लता धांडे, राजू घोडाम, मोहित अत्रे, विलास लोखंडे, जगदिश शेंद्रे, देवनाथ सयाम, राजेंद्र तूपटे, पंकज चहांदे, दुर्वास नाईक, गणेश करपते, तांबेश्र्वर ढोरे, दिवाकर पोटफोडे, शालिकराम पत्रे, रजनीकांत मोटघरे, गिरिधर तीतराम, जावेद खान, शहनाज पठाण, विनोद कुंभारे, गिरिधर कामथे, भूमेश्र्वर शिंगाडे, आदी उपस्थीत होते.
काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या महारॅलीस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षनेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी व देशभरातील प्रमुख नेते येणार आहेत. असल्याचे महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी सांगितले.








