शेतकरीपुत्र तुषार दुधबावरे यांचे सुयश

1331

इतिहास विषयात ‘पेट’ परिक्षा उत्तीर्ण

सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

विधायक दीपस्तंभ न्यूज
चामोर्शी (जिल्हा गडचिरोली):
चामोर्शी शहरातील, संताजी नगर वार्डातील शेतकरीपुत्र तुषार रमेश दुधबावरे हे संशोधनासाठी नेट ,सेट च्या धर्तीवर घेण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाची नुकताच निकाल लागलेली पीएचडी करिता पेट परीक्षा 2023 पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करून यश संपादन केले आहे.

प्रामुख्याने इतिहास हा विषय कला शाखेतील अत्यंत कठीण व तितकाच भीतीदायक विषय समजला जातो.

तुषार चे पदव्युत्तर पदवी साठी चे उच्चशिक्षण हे पुण्यातील नामांकित महाविद्यालय महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आबासाहेब गरवारे महाविद्यालय ,पुणे मधून इतिहासात (एमए) झाले.

तुषार ने आपल्या यशाचे श्रेय आईवडील, कुटूंब ,शिक्षकवृंद आणि सहकार्य करणाऱ्या आपल्या बंधुसमान असणाऱ्या सर्व मित्रमंडळींना दिलं आहे.

यशस्वी तुषारचे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक व नागरिक अभिनंदन करीत आहेत.