आरमोरीत धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन

410

युवारंग व लोकप्रिय रंजित फोटो स्टुडिओचा पुढाकार

विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी :- नेहमी क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, शिक्षा व सामाजिक उपक्रम साजरे करणाऱ्या युवारंग लोकहीत संघटना आरमोरी व लोकप्रिय रंजित फोटो स्टुडिओचा संयुक्त विद्यमाने दिनांक. १५ नोव्हेंबर २०२३ ला भारतीय स्वातंत्रासाठी प्राणपणाने लढा देणारे ,इंग्रज सरकार ला सळो की पळो करून सोडणारे धरतीचे आबा, आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती माल्यार्पण व पुष्पार्पण करून भगवान बिरसा मुंडा यांच्या नावाचे जयघोष देऊन साजरी करण्यात आली.

याप्रसंगी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक अरून वाघ,सेवानिवृत्त कर्मचारी मोतिराम तुलावी , घनश्याम धकाते ,युवारंग चे संघटक रंजित बनकर,विधायक दीपस्तंभ न्यूज चे संपादक विलास गोंदोळे ,युवारंग चे उपाध्यक्ष मनोज गेडाम, बहुजन युवा नेते प्रा. प्रशांत दोनाडकर,राजमाता जिजाऊ कराटे ग्रुप चे संयोजक रोहीत बावनकर,युवारंग सदस्य आशुतोष गिरडकर ,लिलाधर मेश्राम, शुभम वैरागडे, अंकीत बन्सोड, विभाताई बोबाटे ,ज्योतीताई वाघमारे, आशाताई बोलणे, उमाताई कोडापे, महानंदा शेंडे व बहुसंख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक वाघ,तुलावी, धकाते, युवारंग चे संघटक रंजित बनकर व पत्रकार विलास गोंदोळे यांनी बिरसा मुंडा यांच्या काळातील जल,जंगल, जमीन व मागासवर्गीय समाज विरूद्ध सामंतशाही संघर्ष यांचे चित्र आपल्या वक्तव्यातून रेखाटले.तसेच भारतवासीयांनी बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा आजच्या आधुनिक युगातही चालविणे प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.

कार्यक्रमाचे सुरेख संचालन प्रा.प्रशांत दोनाडकर यांनी केले.तर आभार युवारंगचे उपाध्यक्ष मनोज गेडाम यांनी मानले.

‘बिरसा मुंडा करे ऐलान, उलगुलान उलगुलान!’अशा घोषणा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.