विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा आरमोरी( जिल्हा गडचिरोली): येथे बलिप्रतिपदा( दिपावली) दिवसाच्या शुभ मुहुर्तावर 2008 ला सुरु करण्यात आलेले नि:शुल्क योग शिबिराचा स्थापना (प्रारंभ) दिवस आज दिनांक १४ नोव्हेंबर २०२३रोजी मोठ्या उत्साहात येथील तहसील कार्यालयातील प्रांगणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते तथा शिक्षणमहर्षी भाग्यवान खोब्रागडे होते.प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डाॅ.रामकृष्ण मडावी,पतंजली जिल्हा प्रभारी योगगुरु सत्यनारायन चकीनारपुवार,योगगुरु डाॅ.रामहरी राऊत ,प्रा.गंगाधर जुआरे,योग शिक्षिका सिन्दुताई कोरडे,सौ.चकीनारपुवार आदी योग मंचावर उपस्थित होते.
दैनंदिन योगामुळे मन शांत व एकाग्रता वाढते व शरीरात ऊर्जा निर्माण होते.ही योगासने आपल्या शरीरासाठी संजीवनी असल्याचे प्रतिपादन भाग्यवान खोब्रागडे यांनी अध्यक्षीयस्थानावरून बोलतांना केले.योगासनामुळे रोगप्रतिरोधक क्षमता व एकाग्रता वाढत असल्याचे सांगून, दीर्घकाळ फायदे असल्याचे डाॅ.रामकृष्ण मडावी यांनी सांगीतले.
प्रास्ताविकात योगगुरू चकीनारपुवार म्हणाले की,प्राणायाम, ध्यान धारणा हे आपल्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर असल्याने ते नियमितपणे करावे असे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन हेमंत बांडे तर आभार आर एच राऊत यांनी मानले.
यशस्वीतेसाठी गुलाबराव मने, जिल्हा योग प्रशिक्षक धनराज कांबळे, लिलाधर मेश्राम,चरणदास चापले, व्हि.जी घरत,रामचंद् धकाते,धनश्याम धकाते, भाष्करराव नवघरे,स.च.चकीनारपुवार, सौ.शैलजा चकीनारपुवार आदिंनी सहकार्य केले.