आरमोरीत बहुजन समाज पार्टीचा भव्य जन आक्रोश मोर्चा

196

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी ( जिल्हा गडचिरोली):’बहुजनो शासक बनो’ अभियानातंर्गत बहुजन समाज पार्टी, विधानसभा आरमोरीच्या वतीने दिनांक ३१आॅक्टोंबर २०२३रोजी दुपारी १वाजता तहसील कार्यालय आरमोरीवर भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर मोर्चाची सुरूवात बाजार चौक आरमोरी इथून होणार आहे व बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारींचे नेतृत्वात सदर मोर्चा तहसील कार्यालय आरमोरी येथे धडकणार आहे.

सदर मोर्चात ओ.बी.सी. ची जनगणना झालीच पाहीजे, महीला आरक्षणात ओ.बी.सी. / एस.सी./एस.टी. साठी पृथक आरक्षण असलेच पाहीजे,खाजगीकरण, कंत्राटीकरण बंद झालेच पाहीजे,
गाव तिथे शाळा, शाळा तिथे शिक्षक असायलाच पाहीजे,
प्रत्येक विद्यार्थ्यांना पदवी पर्यंतचे शिक्षण मोफत मिळालेच पाहीजे,
ओ.बी.सी. / एस.सी./एस.टी. विद्यार्थ्यांची प्रलंबीत शिष्यवृत्ती ताबडतोब देण्यात यावी, सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना शासकिय नोकऱ्या देण्यात यावे,
सर्व बेरोजगार पदवीधरांना शासकिय नौकरी मिळेपर्यंत प्रतीमहा २०,०००/- हजार रु. मानधन देण्यात यावे,शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्या,शासकिय सेवेत असणाऱ्या डॉक्टरांचे खाजगी वैद्यकिय सेवा बंद करण्यात यावी,गावोगावी शासकिय बस सेवा अधिक व नियमित करावी,
वडसा देसाईगंज येथे मेडिकल कॉलेज देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.

मोर्चात बहुसंख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या अधिकारांप्रती जागरूक असावे असे आवाहन बहुजन समाज पार्टीच्या आरमोरी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी यांनी केले आहे.