रायुकाॅंच्या आरमोरी तालुका अध्यक्षपदी दिवाकर गराडे

385

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी (जिल्हा गडचिरोली): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नामदार धर्मरावबाबा आत्राम, रायुकाॅंचे सुरजदादा चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या मान्यतेने आरमोरी येथील सेवाभावी कार्यकर्ते दिवाकर गराडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस आरमोरी तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे.

नियुक्ती बाबतचे प्रमाणपत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी दिवाकर गराडे यांना प्रदान केले आहे.

निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमीन लालानी, तालुका कार्याध्यक्ष सुनील नंदनवार,शहर कार्याध्यक्ष प्रदीप हजारे, जिल्हा सरचिटणीस दिपक बैस,कुणाल राऊत,रामा खरकाडे, आकाश नारनवरे ,पामुल दुमाने, विकास गराडे,कुणाल नारनवरे, पंकज खोब्रागडे आदींनी अभिनंदन केले आहे.
_________________________
#युवकांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देणार
– दिवाकर गराडे
नवनियुक्त तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस
आपण सर्वप्रथमता युवा वर्गाच्या विविध प्रकारच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.असे मत *विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क* सोबत बोलताना नवनियुक्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिवाकर गराडे यांनी व्यक्त केले.
_________________________