राष्ट्रीय बौध्द महासभेचा पुढाकार
विधायक दिपस्तभ वृत्तसेवा
महाराष्ट्र, उत्तरप्रदेश,दि. 10 मार्च : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून बौध्द बांधवांच्या विशेष पाच मागण्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी राष्ट्रीय बौध्द महासभेच्या विविध राज्य, जिल्हा व तालुका स्तरीय शाखेच्या वतीने महामहीम राष्ट्रपती व बिहार सरकार यांना विविध राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालय (प्रशासन ) यांचे मार्फत निवेदन आज दिनांक 10 मार्च 2026 रोजी पाठविण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राष्ट्रीय बौद्ध महासभा सातत्याने समाज प्रबोधनाचे कार्य करून बुद्ध, फुले-शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बहुजन समाजात रुजविण्याचे कार्य करीत आहे. त्याचबरोबर समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी धरणे आंदोलन करणे, पत्रकाद्वारे निवेदन देणे इत्यादी कायदेशीर मार्गाने सरकारसमोर मांडत असते. त्याच अनुषंगाने 10 मार्च 2026 ला राष्ट्रीय स्तरावर आपल्या न्यायोचित मागण्या करीता जिल्हा, तालुका स्तरावर धरणे आंदोलन व निवेदन नागपूर/गडचिरोली/चद्रपूर जिल्हाधिकाऱ्यामार्फत महामहिम राष्ट्रपती व बिहार सरकार यांना देण्याचा कार्यक्रम राबवित असून यात खालील प्रमाणे मागण्या आहेत.
🟧 10 मार्च ला सावित्रीबाई फुले स्मृति दिना निमित्त त्यांना ‘भारत रत्न’ ही उपाधी देऊन त्यांचा सन्मान व गौरव करणे.
🟥 महाबोधी महाविहाराचे प्रबंधन पुर्णतः बौद्धांना सोपविणे व असंविधानिक बी.टी. अॅक्ट 1949 रद्द झाला पाहिजे.
🟪इतर धर्मियाप्रमाणे बौद्ध धर्मियांना पृथक ‘धर्म संहिता’ (पर्सनल लॉ) बनला पाहिजे.
🟩 पाली भाषा ला संविधानाच्या आठव्या सुचीमध्ये सामिल केले पाहिजे.
⬜ महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले व माता फातिमा शेख यांचा जिवन संघर्ष सर्व स्तरावरील पाठ्यक्रमात सामिल केला पाहिजे.आदी मागण्याचा समावेश आहे.
निवेदन देतेवेळी 📄उत्तरप्रदेश:आगरा, मथुरा अलीगढ, कासगज, एटा, बरेली, महोबा, हमीरपूर, बादा, ललीतपूर, झासी, अयोध्या, गाजीपूर इत्यादी ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
📄 संभाजीनगर ( महाराष्ट्र):राष्ट्रीय महासचिव डॉ. आनंद भालेराव, प्रदेश मुख्य महासचिव रामभाऊ पेटकर, झोन अध्यक्ष प्रा. डॉ. राघोबा पुडगे, झोन महासचिव प्रो. दिलीप वरघट आदी उपस्थित होते.
📄नागपूर : महाराष्ट्र राज्याध्यक्ष डॉ. चांगदेव शेंडे , संयोजक ईश्वर कडबे,जिल्हा अध्यक्ष नरेंद्र मेश्राम, अम्बादास धनविजय, मायाताई सहारे, सगीता काबळे, महिला आघाडी सयोजिका सुनंदा नितनवरे व बहुसंख्य बौध्द बांधव उपस्थित होते.
📄गडचिरोली :राष्ट्रीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष विजय देवतळे, जिल्हा महासचिव ज्ञानोदय वाळके, विदर्भ इजार्ज बडूभाऊ वाकडे, राजेश लिगायत, सिध्दार्थ घुटके, शहर महिला अध्यक्ष निर्मलाताई बोरकर आदी
📄सिंदेवाही (चद्रपुर):राष्ट्रीय बौध्द महासभा शाखा सिदेवाही पदाधिकारी उपस्थित होते.
📄मध्यप्रदेश :-शाजापूर, भिड, आगरमालवा, दतीया, भोपाल, ग्वालियर, सतना, देवास, राजगड, जबलपूर, सिन्धी, गुना, शिवपुरी, कटनी, उमरीया इत्यादी ठिकाणी निवेदन देताना बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
📄दिल्ली :-पश्चिम दिल्ली, दक्षिण पश्चिम दिल्ली, दक्षिण पूर्व, विहार भवन दिल्ली इत्यादी
📄छत्तीसगड :भिलाई
📄जम्मू काश्मिर-जम्मू, डोडा
📄हिमाचल
📄पंजाब :-मुक्तसर
📄झारखंड:-गिरीडोह
📄उत्तराखंड :-पिथौरागड
📄राजस्थान :-जयपूर इत्यादी ठिकाणी निवेदन देण्यात आले. त्यावेळी राष्ट्रीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते,मान्यवर उपस्थित होते.










