8 मार्चला आरमोरी येथे भव्य हिंदू संमेलन

221

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी( जिल्हा गडचिरोली )6 मार्च :सकल हिंदू समाज आरमोरी मंडळ, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली यांच्यावतीने हिंदू समाजाला नवी दिशा देण्यासाठी सनातन संस्कृती, सनातन धर्म व सामाजिक एकतेच्या दृढतेसाठी हिंदू संमेलनाचे आयोजन रविवार दिनांक 8 मार्च 2026 ला क्रीडा संकुल हितकारणी महाविद्यालय आरमोरी येथे करण्यात आलेले आहे.

संमेलनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत भजन मंडळ इंजेवारी, शिवनी, सायगाव यांचे संमिश्र भजन तर दुपारी तीन वाजता आरमोरी, अरसोडा, रवी, पालोरा,शिवनी, सायगाव, वघाळा वासीय यांच्या सहभागाने भव्य कलश यात्रा तसेच सायंकाळी चार वाजता शिवशंभु विचार मंच विदर्भ प्रांत, संयोजक गजानन शिंदे पाटील हे संमेलनाला मार्गदर्शन करतील. तसेच छत्तीसगड राज्यातील डोंगरगाव येथील पंडित विनोद जी बिहारी गोस्वामी महाराज हे आशीर्वाचन देतील. यानंतर सायंकाळी सव्वा पाच वाजता भारत माता आरती होईल. आरती नंतर लगेच कार्यक्रमाची सांगता होईल.

हिंदू संमेलनाला नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन सकल हिंदू समाज आरमोरी मंडळ यांनी केले आहे.