घरेलू कामगारांनी तत्काळ नोंदणी करावी

251

सरकारी कामगार अधिकारी कार्यालय गडचिरोली यांचे आवाहन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.१६: असुरक्षित तसेच घरेलू काम करण्याकरिता ठेवण्यात आलेला कामगार म्हणजेच घरेलू कामगार होय. घरेलू कामगार हे कायद्याच्या कोणताही भागामध्ये येत नाहीत. तसेच त्यांना काही लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे की, घरेलू कामगार हे कायद्याच्या एका भागात येतील त्यासाठी एक कायदा बनविण्यात आलेले आहे. त्या अधिनियमास महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम २००८ असे म्हणतात. या अधिनियमान्वये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना दि. १२ ऑगष्ट २०११ रोजी करण्यात आलेली आहे. या मंडळांतर्गत वय वर्षे १८ ते ६० या वयातील घरेलू कामगार नोंदणी करण्यास पात्र आहेत.

नोंदणी करीता आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. घरमालकाकडे काम करीत असल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड, बँकेचे पासबुक, २ पासपोर्ट फोटो

📄मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना :-

. महिला घरेलू कामगार यांना पहिल्या दोन अपत्याकरीता प्रसुती लाभ योजना रक्कम रू. ५०००/-

२. घरेलू कामगारांच्या पाल्यास शैक्षणिक सहाय्य ३०० /- रू.

३. वयाचे ५५ वर्षे पूर्ण झालेल्या घरेलू कामगाराना सन्मानधन योजनेतर्गत रक्कम रू. १०,०००/-
(सदर लाभ एकदाच अनुदेय आहे.)

४. घरेलू कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास अंत्यविधी साठी रक्कम रू. २०००/- इतके अर्थसहाय्य.

५. मंडळाने वेळोवेळी निश्चित केलेले इतर लाभ.

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातंर्गत नोंदणी करीता सरकारी कामगार अधिकारी, गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय संकूल, बॅरेक क्र. २, गडचिरोली या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून घरेलू कामगारांनी नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन सीमा शिंदे, सरकारी कामगार अधिकारी, कार्यालय गडचिरोली यांनी केले आहे.

0000

फोटो साभार: गुगल