विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.१५: गडचिरोली जिल्ह्यात सन 2025-26 या वर्षासाठी रब्बी पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली असून जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 65 पैसे इतकी ठरविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली आहे.
जिल्ह्यात एकूण 1,689 गावे असून त्यापैकी 148 गावे रब्बी पिकाची आहेत. या रब्बी पिकाच्या गावांपैकी 88 गावांमध्ये पीके नसल्याचे आढळून आले आहे. उर्वरित रब्बी पिक असलेल्या गावांपैकी 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेली एकही गाव नाही. तर 50 पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या रब्बी पिकाच्या गावांची संख्या 60 आहे.
या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण 60 गावांमध्ये रब्बी पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली असून सन 2025-26 या वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्याची रब्बी पिकांची हंगामी पैसेवारी 65 पैसे इतकी निश्चित करण्यात आली आहे.
0000
फोटो साभार: गुगल









