राष्ट्रीय खाद्य तेल अभियान: तेलबिया पिकांवर 14 ऑक्टोबरला मार्गदर्शन

73

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.१३ आॅक्टोंबर २०२५:कृषी विभाग अंतर्गत राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेलबिया
(NMEO-OS) सन 2025-26 यावर्षी जिल्ह्यात नवीन अभियान सुरु होत असून सदर अभियान अंतर्गत रब्बी करडई, तीळ, जवस, मोहरी, भुईमुग इत्यादी तेलबिया पिकांचे महत्व पटवून त्याचे शेतकऱ्यांना व्यापक जनजागृती होईल व पर्यायाने त्याचा लाभ शेतकऱ्यांना व नागरिकांना होईल तसेच क्षेत्र, उत्पादन व उत्पादकतेत वाढ होईल. पेरणीपासून ते काढणीपश्यात चे लागवडीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल या हेतूने दिनांक 14 आक्टोबर 2025 रोजी वेळ सकाळी 10.30 वाजता सुमानंद सभागृह, आरमोरी रोड गडचिरोली येथे आयोजित केलेले आहे.सदर कार्यक्रमात तेलबिया लागवड व काढणीपश्यात प्रक्रिया करणारे शेतकरी स्वत: मार्गदर्शन करणार आहेत.

सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला शेतकरी व शेतकरी यांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा. असे आवाहन गडचिरोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

—————————————-
योजनेचे उद्धिष्ट :
1. गळीतधान्य पिकांखालील सिंचित क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता यामध्ये वृद्धी करणे
2. कमी उत्पादकता असणाऱ्या पिकांखालील क्षेत्र गळीतधान्य पिकाखाली आणणे.

3. तृणधान्य/ कडधान्य पिकात आंतरपिकाद्वारे गळीतधान्य पिकांखालील क्षेत्रात वाढ करणे.

4. भात पिकाच्या काढणी नंतर पडीक राहणाऱ्या क्षेत्रावर गळीतधान्य पिके घेऊन क्षेत्र विस्तार करणे.

0000