देलनवाडी येथे नागरीकांना विविध दाखल्याचे वाटप

62

महाराजस्व अभियान सेवा पंधरवडाला भरघोस प्रतिसाद 

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा 
आरमोरी, जिल्हा गडचिरोली:- दिनांक 3/10/2025 छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान सेवा पंधरवाडा या अभियानांतर्गत दिनांक 30 /9 /2025 रोजी जिल्हा परिषद शाळेत देलनवाडी येथे घेण्यात आलेल्या महाराजस्व अभियानात अनेक दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

जिल्हा परिषद शाळा देलनवाडी येथील पटांगणात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देलनवाडी येथील सरपंच श्रीमती प्रियंका ताई कुमरे ह्या होत्या. तर उदघाटन आरमोरी येथील तहसीलदार श्रीमती उषा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून व मार्गदर्शक म्हणून नायब तहसीलदार  हरिदास दोनाडकर, धनराज वाकुडकर,ललित लाडे , भीमेश्वर जांभूडे तंटामुक्तीचे अध्यक्ष ,दिघेश्वर धाईत माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष, ,कोमलताई धुर्वे पोलीस पाटील , मानापुर येथील सरपंच मयुरीताई पेंदाम, मंडल अधिकारी डी .जी किरगे तसेच मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी तसेच मंडळातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

शिबिरामध्ये जनतेला अनेक लाभ देण्यात आले या शिबिरा दरम्यान आधार अपडेट 04 लोकांचे करण्यात आले आयुष्यमान कार्ड 11 लोकांचे काढण्यात आले, सातबारा वाटप 40, लोकांना करण्यात आला लक्ष्मी मुक्ती योजना 15 लाभार्थ्यांना देण्यात आली आहे.निवासी पट्टेवाटप चा लाभ 45 लोकांनी घेतला, भूमी अभिलेख अंतर्गत सनद वाटप ही 05 लोकांना देण्यात आले.

या अनेक अशा योजनांचा लाभ या महाराजस्व अभियानामध्ये नागरिकांना देण्यात आला या अभियानाच्या माध्यमातून अनेक लोकांचे कार्य हे सुखकर झाले असल्याची प्रतिक्रिया लोकांच्या मुखातून निघत आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देलनवाडी येथील ग्रामपंचायतचे कर्मचारी पदाधिकारी व महसूल विभागातील कर्मचारी व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.